प्रवीण दरेकर यांचा वृद्ध दाम्पत्याला आधार, दीड महिन्यानंतर पोहोचले गावी...

Update: 2020-05-21 16:02 GMT

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी एका वृद्ध दाम्पत्याची मदत केली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव इथलं जाधव दाम्पत्य रत्नागिरी जिल्ह्यात व्यापारासाठी आलं होतं. लॉकडाऊन मुळे ते कोकणात अडकलं होतं. लॉकडाऊन मुळे त्यांना घरी जाता येत नव्हतं. त्यातच त्यांचा कोरोना चा व्यवसाय देखील बंद पडला होता. जवळ असलेल्या पैसे ही संपत आले होते.

कोकण दौऱ्यावर असलेल्या दरेकर यांना ही माहिती समजताच दरेकर यांनी या वृद्ध दाम्पत्याची भेट घेऊन त्यांना मदत केली. तसंच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून जाधव दाम्पत्याला गावी जाण्यासाठी परवानगी मिळवून दिली आहे. जाधव दाम्पत्यानं दरेकर यांचे आभार मानले आहेत. अजुनही कित्येक छोटे व्यापारी देशात अशा पद्धतीने अडकून पडले आहेत.

Similar News