भाजप फेसबुकच्या संबंधांची संसदीय समितीमार्फत चौकशी करा : काँग्रेस

Update: 2020-08-17 01:57 GMT

भाजप (bjp)नेत्यांच्या द्वेषाधारीत पोस्ट नियमाप्रमाणे काढून टाकण्याऐवजी फेसबुकने त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. तसेच निवडणुकीत फेसबुकने (facebook) भाजपला मदत केली, असा गौप्यस्फोट करणारे वृत्त अमेरिकेतील The Wall Street Journal ने दिल्यानंतर भारतातील राजकारण आता चांगलेत तापले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हे वृत्त आल्यानंतर तातडीने ट्विट करत गंभीर आरोप केला. “भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फेसबुक आणि व्हॉट्सअॅकपवर नियंत्रण ठेवतात. तसेच खोटय़ा बातम्या पसरवून मतदारांवर प्रभाव पाडतात, अमेरिकेच्या माध्यमांनी हे सत्य समोर आणले आहे, “ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला करत, “स्वत:च्या पक्षातील लोक ज्या पराभूत नेत्यांचे ऐकत नाही तेही आता सगळ्या जगावर भाजप आणि संघाचे नियंत्रण असल्याचे रडगाणे गात आहेत. केम्ब्रिज एनालिटिका आणि फेसबुकवरला हत्यार बनवत तुम्ही निवडणुकीत त्याचा वापर करत असताना रंगेहात पकडले गेले आहात आणि आता उलटे आरोप करत आहात” अशी टीका केली आहे.

दरम्यान काँग्रेसचे (congress) प्रवक्ते अजय माकन (ajay maken)यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पण त्याचबरोबर फेसबुकच्या जागतिक प्रतिष्ठेशी संबंधित हे प्रकरण असल्याने कंपनीनेही अंतर्गत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

Similar News