बिहारच्या काका पुतण्याच्या लढाईचा मास्टर माइंड कोण?

Update: 2021-06-15 17:30 GMT

देशात गेल्या काही दिवसात राजकीय घडामोडीला वेग आला आहे. तिकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी विरुद्ध मोदी असा सामना रंगलेला असताना इकडे महाराष्ट्रात शरद पवार तिसऱ्या आघाडीच्या तयारीला लागले आहेत. पंजाबमध्ये बसपा आणि अकाली दल कॉंग्रेस विरोधात मोर्चा बांधणी करत आहे. हे सगळं सुरु असताना दिवंगत नेते राम विलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान स्वत:च्याच पक्षात एकटे पडले आहेत.

लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या चिराग पासवान यांना त्यांच्याच काकांनी धोबी पछाड केलं आहे. सध्या लोकजनशक्ती पक्षाचे 6 खासदार आहेत. यातील 5 खासदारांनी पक्षाशी बंड केलं आहे. त्यामुळं लोकजन शक्ती पक्षात फक्त एकच खासदार शिल्लक राहिले आहेत. मात्र, या सर्व राजकारणामागे नितिश कुमार यांचा हात असल्याचं बोललं जात आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊयात...

Tags:    

Similar News