मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचणीच्या नियमांचं उल्लंघन – देवेंद्र फडणवीस

Update: 2020-04-19 01:52 GMT

मुंबई महापालिकेने कोरोनाच्या चाचणीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. पण या बदलांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे, तसंच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं आहे.

मुंबई महापालिकेने कोरोनाच्या चाचण्यांबाबत ICMR ने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासंदर्भात फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. मुंबई महापालिकेने नुकताच एक निर्णय घेत कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अत्यंत जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केले जाईल पण कोरोनाची लक्षण दिसत नसतील तर त्यांची चाचणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय म्हणजे कोरोनाबाबतच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांचं आणि ICMRच्या आदेशांचं उल्लंघन असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

“ जगभरातील ४४ टक्के कोरोना रुग्णांना कोणतीही लक्षणं नव्हती. त्यामुळे मुंबई महापालिकेने असा निर्णय घेऊन इतरांनाही धोका निर्माण केला आहे ” असं फडणवीस यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर असा निर्णय घेऊन महापालिका नवीन रुग्णांची संख्या कमी झाल्याचं दाखवू शकेल पण त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होणार नाही, हे महापालिकेने लक्षात घ्यावे”, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

Similar News