डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. या प्रकरणानंतर खरात आरपीआय चे नेते सचिन खरात यांनी आंबेडकर कुटुंबाला Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाचे संविधान लिहून भारत देशाला लोकशाही दिली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या घरावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. म्हणून आंबेडकर कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा तात्काळ दयावी. अशी मागणी केली आहे.