नेहरू आणि हाऊडी मोदी!

Update: 2019-09-23 06:00 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत केलेल्या शक्तीप्रदर्शनादरम्यान गांधींची शिकवण आणि नेहरूंच्या दूरदृष्टीच्या पायावर धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा पाया रचला गेला, तसंच विविधता आणि मानवाधिकारांचं रक्षण केलं गेलं असं म्हणत अमेरिकेच्या मेजॉरीटी हाऊस लिडर स्टेनी होयर यांनी म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या विरोधात ट्रम्प यांनी सोबत उभं राहून भारताला मदत केल्याचं सांगून अमेरिका आणि भारताच्या संबंधांच्या नव्या युगाचा हा प्रारंभ असल्याचं सांगितलं.

मोदी यांच्या भाषणात जरी नेहरूंबद्दल किंवा त्यांच्या योगदानाबद्दल कसलाही उल्लेख येत नसला तरी आंतरराष्ट्रीय समुदाय नेहमीच गांधी-नेहरू यांचा उल्लेख करत आला आहे. नेहरू आणि परिवारवाद यावर हल्ला करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ ची निवडणूक जिंकली अशा वेळी नेहरूंच्या नावाचा होयर यांनी केलेला उल्लेख जाणीवपूर्वक असावा असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Similar News