खामगावात 'ट्रान्झिट ट्रीटमेंट' केंद्राला मान्यता

बुलढाणा जिल्ह्यात आता यपुढे जायबंदी झालेल्या वन्यप्राण्यांवर उपचार करता येणार आहेत. कोलकत्ताच्या धर्तीवर अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र उभारण्यात आहे. त्यासाठी खामगावात 'ट्रान्झिट ट्रीटमेंट' (Transit Treatment) केंद्राला मान्यता देण्यात आली आहे.

Update: 2023-03-09 14:20 GMT

वन्य संपदेचे वरदान लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील वन्यजीव विभाग व लाखो वन्यजीव प्रेमींसाठी एक 'गुड न्यूज' आहे. जिल्ह्यातील जायबंदी वन्यप्राण्यांना उपचारासाठी शेकडो किलोमीटर अंतरावर नेण्याची गरज राहणार नाही. याचे कारण आता लवकरच खामगाव (Khamgaon) तालुक्यात कोलकत्ताच्या धर्तीवर अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र (Wildlife Treatment Centre) उभारण्यात येणार आहे. यासाठी साडेदहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील ज्ञानगंगा, अंबाबरवा व लोणार अभयारण्यामधील जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी त्यांना शेकडो किलोमीटर अंतरावरील नागपूर किंवा पुणे येथे नेण्याची गरज राहणार नाही. यामुळे वन्य प्राण्यांना जीवनदान मिळण्याची शक्यता जास्त असणार आहे.

खामगांव विधानसभा मतदार संघात बुलढाणा प्रादेशिक वन विभाग खामगांव (Regional Forest Department) वनपरिक्षेत्रात ज्ञानगंगा अभयारण्य आहे. तसेच जळगाव जामोद मतदारसंघात अंबाबरवा अभयारण्य आहे. याशिवाय लोणार सरोवर परिसरात संरक्षित क्षेत्र आहे. शेकडो हेक्टरमध्ये पसरलेल्या या जंगलात बिबटे, अस्वल, काळविट, निलगाय, साळींदर, अस्वल, मोर, अशा अनेक प्रकारचे संरक्षित पशुपक्षी आहेत. नैसर्गिक कारण वा मानवी अपघातामुळे अनेक वेळा प्राणी जखमी किंवा आजारी असतात. या प्राण्यांना योग्य उपचार न मिळल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागतात.

खामगांव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी खामगांव येथे नवीन 'ट्रान्सीट ट्रिटमेंट सेंटर' स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सुचना केली होती. खामगांव तालुक्यातील जनुना येथे हे आधुनिक उपचार केंद्र मंजूर करण्यात आले आहे. सद्यस्थ‍ितीत दूरवरच्या नागपूर व पुणे येथेच वन्यजीवांना उपचारार्थ न्यावे लागते. त्यांना उपचारार्थ नागपूर अथवा पुणे येथे नेण्यास ३०० ते ५०० किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेक वन्यजीवाना प्राण गमवावे लागत आहे. दुसरीकडे अभयारण्यात अस्वलांची संख्या मोठी आहे. या अस्वलांच्या संरक्षणासाठी व उपचारार्थ विशेष सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव सहाय्यक वन संरक्षक बुलढाणा यांनी डिसेंबर २०२२ मध्ये वनविभागास परिपुर्ण प्रस्ताव सादर केला होता. 

Tags:    

Similar News