महिलांच्या सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पुन्हा एकदा महिला अत्याचारांच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना १७ तारखेला चेंबूरमध्ये घडली आहे. एक अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत ट्युशनवरुन घरी जात असताना त्याचवेळी इम्रान नावाच्या व्यक्तीने तिला शिवीगाळ करत होता. त्यामुळे पिडीत मुलीने त्याला शिवीगाळ का करतो? असे विचारले असता त्याने तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत ही तरूणी बेशुद्ध झाली. हा सगळा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसात या संदर्भात तक्रार केली असता पोलिसांनी किरकोळ कलम लावून आरोपी इम्रानला सोडून दिले. मात्र याप्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतल्यामुळे पुन्हा आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
दरम्यान या सर्व घटनेनंतर आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडित मुलीच्या नातेवाईकांना धमकवण्यात येत असल्याचे पिडीतेच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करत 'केस रफादफा करा नाहीतर बघा' अशी धमकी दिली असल्याचे पिडीतेच्या नातेवाीकांनी म्हटले आहे. तसंच एफआयआर कॉपी, हॉस्पिटलमधील काही पेपरही हिसकावून घेण्याचा प्रयत्न आरोपीच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पिडीत मुलगी आणि तिच्या घराच्यांमध्ये भितीचे वातावरण असून त्यांना पोलिस संरक्षणाची गरज असल्याचे यावरून दिसून येत आहे.
आरोपी इम्राणची दादागिरी
एक दिवसाच्या पोलीस कोठडीतून आरोपी इम्राण सुटून आल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा पश्चत्ताप झाला नव्हता, उलट उलट त्याने 'जर त्यांनी केस परत नाही घेतली तर मी त्या पीडीत मुलीचा रेप करेल' अशी धमकी दिली असल्याची तेथील रहिवाशांनी सांगितले आहे. दरम्यान इम्राणला पोलिसांनी एका दिवसात सोडल्याने पोलिसांवर काही प्रश्न उपस्थित होतात.