पायलट मारिया कुबेर यांचे अखेरचे ‘उडान’

Update: 2018-06-28 15:13 GMT

आकाशात उंच उडण्याची स्वप्न अनेक जण बघतात मात्र ती सर्वांचीच खरी होत नाहीत. मारियाने मात्र आपले स्वप्न खरे करुन दाखवले. आजची सकाळ तिचे शेवटचे उड्डान असेल असे तिला घराबाहेर पडताना वाटले नसेल.

मुंबई घाटकोपर परिसरात जे चार्टर विमान कोसळले त्यात दोन महिलांचाही समावेश होता. त्यातील एक पायलट मारिया कुबेर. दुपारी दोन वाजता झालेल्या या दुर्घटनेत चार लोकांचा मृत्यू झाला. त्यातील एक मारिया. खराब हवामान असतानाही कंपनीने उड्डाणासाठी आग्रह केला, अशी माहिती मारिया यांचे पती प्रभात कथुरिया यांनी दिली आहे. मारिया आणि प्रदीप राजपूत यांनी खराब हवामान असल्याचं सांगितलं. मात्र कंपनीने आग्रह केला, असं प्रभात यांनी सांगितलं.

पायलट होण्याचे अनेक मुली स्वप्न बघतात. मात्र खुपच कमी संख्येने महिला या पदापर्यंंत पोहोचतात. अश्या स्थितीत मारियाच्या जाण्याने खरतर येणा-या पिढीचे आणि खास करुन महिला वर्गाचे नुकसान झालेले आहे. अशी भावना महिला वर्गातून व्यक्त होतांना दिसते.

Similar News