पण, माझं लग्न नाही ठरल तरं? भाग- 1

Update: 2017-04-28 07:55 GMT

मुलींनो प्रॉब्लेम आपला आहे. आपणचच सोडवला पाहिजे. हुंडा निमित्त आहे मरण्याचं तेही शरीराने. मनाने तर रोजच ना? मुलीचा जन्म झाला की नाक मुरडणाऱ्यांना जोरात लाथ द्यायला वेळीच शिकूया. सोज्वळपणाच्या पदव्या घेण्यात काडीमात्र इंटरेस्ट घेऊ नका. स्वतःसाठी जगा. शिका. ध्येयवादी बना. उगी रेसिपी रेसिपी खेळत नको बसायला. चुकूनही सुगरण झालात तर आयुष्यभर खेळायला लागेल मग. किचन किचन...

अपार्टमेंटच्या बालकनीमध्ये कुलरचा गार वारा झेलत प्रीतमसोबत कोकम सरबत घेताना गार्गी भलतीच खुश होती.. कोकम सरबताच्या थंड गारव्यासोबतच प्रितमची नजर तिच्यावर प्रेमाचे तुषार शिंपडत होती...नजरेतल्या भावना शब्दांविनाच खुलत होत्या...

तितक्यात सिक्युरिटी गार्डच्या शिटीच्या आवाजानं दोघं भानावर आले. अपार्टमेंटच्या गेट मधून नुकतीच डिलिव्हरी झालेली रिया कुटुंबियांच्या गाडीतून हॉस्पिटलमधून घरी येत होती. गाडीतून उतरतानाच नव्याने जन्मलेल्या बाळाकडे बघून सासूबाईंनी मुरडलेलं नाक गार्गीच्या चाणाक्ष नजरेतून कस सुटेल? तिच्या या निरीक्षणावर प्रितम मात्र "काहीतरीच काय" या आविर्भावात निशब्द होता. घरी मिठाई म्हणून जिलेबी आल्यावर शिक्कामोर्तबच झालं की आजींना नात झालीय.

गार्गी : जिलेबी आणि पेढ्यालाही कसं अडकवलय ना भेदभावात...

प्रितम : (जिलेबीचा अजून एक घास तोंडात घेत) हम्म...

गार्गी : माझ्या होणाऱ्या बाळाकडे पाहून जर कोणी असं नाक मुरडल तर...

प्रितम : तर...तर...त्याची काही खैर नाही राणी लक्षीबाई...

गार्गी : मी तिला जन्मल्या जन्मल्याच शिकवेन जोरात लाथ द्यायला या नाक मुरडणाऱ्यांना... कारण (भावना विवष होऊन) अरे प्रीतम "पोरीची जात" हा कॉन्सेप्ट लादायला जग तयारच आहे रे त्या निरागस जीवावर....

प्रितम : (तिच्या मानेभोवती दोन्ही हात टाकत) ओ हो...मॅडम ...किती स्वप्न पाहशील....अगं... ती किंवा तो... काय फरक आहे आपल्याला? बंदा, आपकी खिदमत मे हजिर रहेगा.. आपण ना... तिला एकदम डोकेबाज बनवू...

गार्गी: डोकेबाज?? ओय अमेरिकन रिटर्न... किती गावठी बोल्तोयस तू?? आणि डोकेबाज म्हणजे काय? पहिलीपासूनच ती पुस्तकी किडा?

प्रितम : तस नव्हे ग...ती पहिली, दुसरीत गेली ना..तिला शिकवू...शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ...तुझ्या घनदाट केसांखाली जसा एक मेंदू आहे तसा तिच्याही असेल ना (आहे ना तुझ्याकडे?) तोच वापरायला सांगेन....भलेही पोरगी वांड आहे हे बिरूद लागलं तरी चालेल तिला... पण, सोज्वळपणाच्या पदव्या मात्र नको...सुन्दर गुलाबाचं काटेरी देठ म्हणजे त्या गोंडस पदव्या...

गार्गी : बर चल...कृष्णा येईल इतक्यात भांडी फरशी करायला...चल पटकन अंघोळ करून ये...

प्रितम : संथ वाहते कृष्णामाई.... आअअअ...

गार्गी : तू गाणं काय गातोयस...काल बिचारीनं स्वतःचा स्वतंत्र संसार सुरु केलाय एकटीचा...खूप दमते रे ती...(स्वतःच्या केसांचा आंबडा करत ती त्याला बाथरूम मध्ये ढकलते)

प्रितम : सॉरी सॉरी...पण गार्गो....मी ना... माझ्या मुलीला माझ्यासारख कराटे चॅम्पियन बनवणार... (हा! हूं! है! करत टॉवेल तिच्याकडे भिरकवत ) १० वी पर्यंतना तिला कराटे, ज्यूडो, स्वसंरक्षणाची सगळी प्रशिक्षणं देईन... उगी आलियासारखा लेहंगाच हवा, ब्युटी क्रीम हवी, नेलपेंट हवं, आणि काय काय भन्नाट असतंय ते तुमचं मेकअपच त्यात तिला अडकवणार नाही...

गार्गी : अरे पण मुलींना असते आवड नटण्याची सजण्याची... मग रुसेल ना ती...

प्रितम : मला हेच कळत नाही तुम्हा मुलींचं, मनासारखं काही नाही मिळाल तर बसतात कोपऱ्यात जाऊन...सगळे येऊन लाड करतात नंतर... तुम्हाला कसं कळत नाही, तुमचं स्वघोषित दुबळेपण यातूनच तर सुरु होतं...

गार्गी : हो रे माझ्या राजा! (काळजीच्या सुरात) पण तुला वाटतंय हे होईल? माझ्या एकटीच्या पगारात? तू तर कलेसाठी, तुझ्या छंदासाठी अमेरिकेतला जॉब सोडून आलास भारतात. तुझ्या पेंटिंगमधून इतका पैसा मिळेल भारतात. तूझी इतकी भली मोठी स्वप्न पूर्ण होतील?

प्रितम : स्वतःवर विश्वास हवा गार्गी. पण, समज मी नाही मिळवू शकलो तितके पैसे तर कमवा व शिका योजनेत भाग घ्यायला सांगेन तिला. तुझ्या माझ्यावरही अवलंबून नाही ठेवायचं मला तिला. ती जेव्हा कॉलेजला जाईल तेव्हा सांगेन तिला स्वतःसाठी जगायचं. शिकायचं. ध्येयवादी बनायचं. उगी रेसिपी रेसिपी खेळत नाही बसायचं. चुकून सुगरण झाली की आयुष्यभर खेळायला लागेल मग. किचन किचन...

गार्गी : हो रे ! भारतातल्या निम्या स्त्रियांना किचनबाहेरच जगच माहीत नाही. तिला मात्र आपण सगळं जग दाखवू. ती कॉलेजमध्ये गेल्यावर पोर येतील. म्हणतील किती सुंदर, मनमोहक गं तू...तुझे डोळे...तुझं नाक...तुझं हसणं...तुझ्यासाठी जीव देईन...तिला अश्या वाक्यांवर बिंधास्त खिदळायला सांगू... कारण हे सगळं सारखं सारखं होणार... नवीन पोर येतील, भुलवण्यासाठी पण डायलॉग जुनाच असतो रे....

क्रमशाः

 

Similar News