मॅक्स वूमन... शोध अस्तित्वाचा या नवरात्री स्पेशलमध्ये आपण भेटणार आहोत. आयर्न मॅन अंजली भालिंगे यांना...
वयाच्या तिशीत शरीराच्या कुरबुरी सुरू होतात. जस जस वय वाढत तश्या त्या वाढत जातात आणि त्यात स्त्रिया असतील तर त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्षच करतात... असं असल तरी आपल्या पन्नासाव्या वाढदिवसाला आयर्न मॅन ही जागतिक स्पर्धा जिंकून अंजली भालिंगे यांनी स्वत:लाच भेट दिली आहे. पन्नास वयाच्या गटात ही स्पर्धा जिंकणाऱ्या अंजली या पुण्यातल्या पहिल्या तर भारतातील पाचव्या महिला आहे. अंजली यांच्याकडून प्रत्येक महिलेला प्रेरणा मिळेलचं वयाचे कोणतेही दडपण न घेता आपण कोणतीही गोष्ट साध्य करु शकतो हेच सिद्ध केलंय आपल्या मॅक्स वूमन अंजली भालिंगे यांनी...