लोकसंख्येतील महिला

Update: 2018-07-11 14:00 GMT

आज जागतीक लोकसंख्या दिवस. या दिवशी खरेतर लोकसंख्येवर लोक भरभरुन बोलणार. लोकसंख्या कशी नियंत्रीत केली पाहिजे? ते किती महत्वाचे आहे याबद्दल अनेक तज्ञ माहिती देतील. मात्र या दिवसाचे महत्व व खासकरुन महिलांसाठी खुप जास्त आहे. कारण मुळात मुलांना जन्माला घालायच की नाही? ते ही कधी? यावर आजही महिलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. किती मुल जन्माला घातली पाहिजेत? या निर्णायात तर तिला कुठे जागाच नसते. तिच्या शरिराचा उपयोग ‘बाळ जन्माला घालणारी ‘मशिन’ म्हणुन होतो. अश्या परिस्थितीत जर लोकसंख्या नियंत्रणावर काम करायचे असेल, तर महिलांचे अधिकार त्यांना समजावून सांगितले पाहिजेत. कुटूंब नियोजनच्या शस्त्रक्रियेतही महिला संखेने जास्त असल्याचे दिसते आहे. कुटूंबाची काळजी हा प्रथम उद्देश महिला ठेवतात. त्यामुळे महिलाच खरतर लोकसंख्या नियंत्रीत करु शकतील. गरज आहे ती ‘त्यांना’ त्यांच्या या शक्तीची जाणीव करुन देण्याची.

Similar News