का अस्वस्थ आहेत अमेरिकेतील महिला ?

Update: 2018-06-19 14:06 GMT

अमेरिकेच्या चार माजी फस्ट लेडी या अस्वस्थ आहेत. अमेरिकन मेसिक्न सरहद्दीवर मुलांना पालकापासून वेगळे केले जात असल्यामुळे त्या अस्वस्थ आहेत. या मुलांचे पालक हे अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश केलेल्या गुन्हात अडकलेले आहेत.

या प्रकरणात मुलांचा काहीही दोष नसतांना त्यांना सरकारी रिमांड होममध्ये ठेवण्यात येणार आहे. १९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत २००० मुलांना पालकापासून वेगळे केले आहे. यातील १०० मुले ही ४ वर्षांच्याही खालील आहेत. अमेरिकेच्या माजी फस्ट लेडी हिलरी क्लिन्टन, मिशेल ओबामा, लोरा बुश व रोसला कारटर यांनी या सगळ्या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. पालकांपासुन मुलांची फारकत या सर्व प्रकाराने अमेरिकेतील सामान्य महिलेपासुन तर माजी फस्ट लेडीपर्यन्त सर्व महिलावर्गात अस्वस्थता आहे.

Similar News