परमवीर चक्राच्या पदकाचे डिझाईन करणारी महिला कोण?

Update: 2018-08-13 14:25 GMT

परमविर चक्राच्या पदकाचे डिझाईन केले होते सौ सावित्रीबाई खानोलकरांनी तेही १९४७ मध्ये!

सावित्रीबाई खानोलकर पूर्वाश्रमीच्या ईव्ही मॅदे दे मॅरॉस. जन्म २० जुलै १९१३ - स्वित्झर्लंडमधील न्यूशातेलमधला. त्यांच बालपण जिनेव्हात गेलं. वयाच्या १६ व्या वर्षी १९२९ मध्ये त्यांची भेट विक्रम खानोलकारांशी झाली. हे विक्रम खानोलकर तेव्हा ब्रिटनमधील सॅन्डहर्स्ट येथे रॉयल मिलिटरी अकॅडेमी मध्ये सैनिकी शिक्षणासाठी आलेले होते आणि सुट्टीमध्ये स्वित्झर्लंडमध्ये फिरायला आले होते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता ईव्ही विक्रम खानोलकरांना शोधत शोधत मुंबईत आल्या आणि हे जोडपे १९३२ मध्ये विवाहबद्ध झाले. लग्नानंतर त्यांनी धर्मांतर करून 'सावित्री' हे नाव घेतले आणि अश्या प्रकारे 'ईव्ही मॅदे दे मॅरॉस' च्या 'सौ सावित्रीबाई खानोलकर' बनल्या.

सैन्यात त्यांचे पती वरिष्ठ पदावर होतेच. आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हाचे मेजर जनरल हिरालाल अटल ह्यांनी सावित्रीबाईंवर सैनिकांसाठी सर्वोच्च शौर्य पदक डिझाईन करायची जबाबदारी सोपवली आणि सावित्रीबाईंनी ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली.

योगायोगाने पहिले परमवीरचक्र सावित्रीबाईंच्या मोठ्या मुलीच्या दिराला - मेजर सोमनाथ शर्मा यांना - काश्मीर युद्धातील शौर्याबद्दल नोव्हेंबर १९४७ मध्ये मरणोत्तर मिळाले.

Similar News