जेव्हा बातम्या सांगताना ANCHOR रडते…

Update: 2018-06-21 11:37 GMT

MSNBC या वाहिनीवरील रिचेल मद्दो या व्रत निवेदिकेला बातमी देता देता आपले अश्रू अनावर झाले. काही जन्मजात बालकांना आपल्या पालकांपासून वेगळं केले जात असल्याची बातमी वाचता वाचता रिचेल यांना अश्रू अनावर झाले. यासंबंधित बोलताना त्या म्हणाल्या की खरेतर कामाच्या ठिकाणी हे घडायला नको होते. मात्र आलेले वाक्यच भयानक असल्याने अश्रू आवरणे कठिन झाले. याबाबत त्यांनी माफी ही देखील मागितली आहे. अमेरिकेत झिरो टोलरन्स या धोरणाअंतर्गत अनेक मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळ केले जात आहे. हे पालक अमेरिकेत अवैधरित्या राहत असल्याचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या झिरो टोलरन्स पॉलिसी तसेच मुलांना पालकांपासून दूर करण्यावर सर्व देशातून टीका होत आहे.

Similar News