कमी पटसंख्या असणाऱ्या अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय मागे घ्या अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. कमी पटसंख्या असणाऱ्या अंगणवाड्या समायोजनाच्या नावाखाली बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय मानव विकासाच्या विरोधात असून बालकांचा पोषण आहार, लसीकरण आणि शिक्षण आदींकडे दुर्लक्ष करणारा आहे. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.