कंजारभाट समाजात आजही कौमार्य चाचणी केली जाते. पण आता दबावतंत्राला भीक न घालता या समाजातील तरुण मंडळींनी पुढाकार घेत ही चाचणी करणार नाही आणि करुही देणार नाही असं ठणकावून सांगितले आहे. 'स्टॉप व्ही रिच्युअल' नावाने सोशल मीडियाच्या माध्यमातून या अनिष्ट प्रथेविरोधात लढा उभारला आहे. काय आहे ही मोहिम ? यावर विवेक तमायेचेकर यांच्याशी बातचीत केलीय आमची प्रतिनिधी प्रियदर्शनी हिंगे यांनी...