रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावणाऱ्या रुणालीच्या स्वप्नांना शिवसेना देणार बळ...
रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावणाऱ्या रुणाली मोरे हिची डॉक्टर बनण्याची इच्छा शिवसेना पूर्ण करणार असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यांनी आज रुणालीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. नववीत शिक्षण घेत असलेल्या रुणालीचा 14 ऑगस्टला दुपारी रेल्वेखाली सापडून अपघात झाला होता. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले.रुणाली ठाण्याच्या मानपाडा परिसरात राहणारी आहे. ती नवीन क्लास शोधण्यासाठी पहिल्यांदाच ठाणे रेल्वे स्थानकात येऊन पोहचली होती.