थायलँडमध्ये शीतल महाजनची 'नऊवारी साडी'त स्‍काय डायव्‍हिंग

Update: 2018-02-12 05:58 GMT

भारतीय स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजन यांनी पहिल्यांदाज नऊवारी साडी नेसून १३ हजार फुट उंचावरून स्कायडायव्हिंग केली आहे. महाराष्ट्राची इतिहास कालीन संस्कृती असणाऱ्या नऊवारी साडीत स्कायडायव्हरशीतल महाजन यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे.

पॅरा जंपर ( स्काय डायव्हर) साहसी खेळात उत्तुंग भरारी घेत पद्मश्री शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळात 17 राष्ट्रीय व 6 जागतिक विक्रम करून भारतीय पहिला महिला असल्याचा मान पटकाविला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची शान असलेली पद्मश्री शीतल महाजन यावेळी मराठी असल्याचा सार्थ अभिमान मनामध्ये घेऊन आपल्या मराठी संस्कृतीचे जतन राहावे. तसेच मराठी बाणा कायम रहावा याकरिता आतापर्यंत जगामध्ये कुणीच असा धाडस केला नसल्याने पहिल्यांदाच महाराष्ट्राची संस्कृती महिलांची नऊवारी साडीचा पेहराव म्हणजे चक्क नऊवारी साडी नेसून विमानातून जम्प केली आहे.

थायलँड देशामध्ये स्कायडायव्हिंग सेंटर येथे १३ हजार फुटावरून आज (सोमवार) नऊवारी साडी नेसून जम्प केली आहे.

स्कायडायव्हिंग करणाऱ्यापूर्वी त्यांनी आपल्या चाहत्यांना एक व्हिडीओ शेअर केला आहे पाहा काय म्हणतायत स्कायडायव्हिंग पद्मश्री शीतल महाजन..

Full View

Similar News