पंकजा मुंडेंनी महिला आर्थिक विकास महामंडळाचा घेतला आढावा

Update: 2018-08-29 11:12 GMT

राज्याच्या ग्राम विकास, महिला व बाल विकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाचा आढावा घेवून महाराष्ट्र ग्रामीण महिलांची उत्पन्न वृद्धी करून त्यांच्या कुटुंबांना शाश्वत उपजीविका मिळण्यासाठी “नव तेजस्विनी” योजना तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश यावेळी पंकजाताई मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सदर बैठकीला जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये बचत गटांनी बांबू पासून तयार केलेल्या राख्या व प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे पंकजा ताईंनी कौतुक केले.

 

Similar News