महिलांचे अंतर्मन उलगडणारा 'लस्ट स्टोरीज्'

Update: 2018-06-20 11:31 GMT

‘नेटफ्लिक्स’ या डिजीटल चॅनेलवर ‘लस्ट स्टोरी’ नावाचा चित्रपट 15 जूनला प्रदर्शित झाला. अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि करण जोहर या चार दिग्दर्शकांनी यात चार वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत.

यातल्या चारही कथा या स्त्री-पुरुषांच्या शहरी भागातल्या लोकांभोवती फिरतात. यातून महिलांच्या लैंगिक गरजांवर भाष्य करण्यात आले आहे. महिलांच्या लैंगिक गरजा, त्यामुळे त्यांच्या जीवनात होणारा बदल, होणारी कुचंबणा या बाबींना सिनेमात वेगळ्या प्रकारे साकारण्यात आलंय.

राधिका आपटे, आकाश ठोसर, भूमी पेडणेकर, मनीषा कोईराला, विकी कौशल, नेहा धुपिया, संजय कपूर अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात बघायला मिळेल. ‘लस्ट स्टोरिज’ च्या माध्यमातून या दिग्दर्शकांनी एक वेगळा पण महत्वाचा विषय डिजीटल चॅनेलवर आणला आहे. सध्या या सिनेमाचा ट्रेलर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

Full View

Similar News