फुटबाॅल सामन्यांत भारतीय महिला संघाने मारली बाजी

Update: 2018-10-25 10:32 GMT

बुधवारी थायलंडमध्ये झालेल्या एएफसी अंडर-19 क्वालिफायर सामन्यात भारताच्या महिला फुटबॉल रणरागिणींनी विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा अगदी काही फरकाने पराभव केला.

या सामन्यात भारतीय महिला संघाने मैदानावर गोलचा धडका शेवटपर्यंत कायम ठेवला होता. या सामन्यातील विजयाने महिला संघाचे प्रशिक्षक अॅलेक्स एंब्रोस यांनी आनंद व्यक्त केला. महिला संघाचे कौतुकदेखील त्यांनी केले. यापुढील सामना नेपाळ व थायलंडमधील संघाशी 26 आणि 28 ऑक्टोबर यादिवशी होणार आहे.

 

Similar News