इराण मध्ये 'मुलीने' डान्स केला म्हणुन केली कारागृहात रवानगी

Update: 2018-07-10 12:04 GMT

इराण येथिल एका १८ वर्षीय तरुणीला कारागृहात ठेवण्यात आले आहे. तिचा गुन्हा ऐकलात तर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. तिने रस्त्यावर डान्स करतानाचा आपला व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला, व त्यासाठी तिला अटक करण्यात आले आहे. या तरुणीच्या समर्थनार्थ हजारो इराणी महिलांनी पुढे येत ‘डान्स विथ अस’ ही चळवळ सुरु केली आहे. डान्स करणे हा काही गुन्हा नाही, तो पुरुषा प्रमाणेच स्त्रीयांचाही अधिकार आहे. हा संदेश या मुली देत आहेत. या चळवळीत सहभागी होत अनेक मुली आपला सार्वजनीक ठिकाणी डान्स करतांनाचा व्हिडीओ अपलोड करत आहेत. त्यामुळे या चळवळीला इराण सह जगभरातील स्त्रीयांचा पाठिंबा मिळतो आहे.

Similar News