ऐतिहासिक निर्णय, मुलीला मिळाली आईची जात 

Update: 2018-06-19 12:24 GMT

जात ही नक्की कशी ठरवली जाते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. जी वडिलांची तीच मुलींची ‘जात’ या वर्षानुवर्षे चालत आलेल्या तत्वाला छेद देत अहमदनगर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने एका घटस्फोटीत मातेच्या मुलीला आईची जात बहाल केली आहे.

वडीलांच्या जातीपेक्षा पालक म्हणून केलेल्या मुलीच्या संगोपनाला आणि मुलगी वाढलेल्या वातावरणाला प्राधान्य देत समितीने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. राज्यात यापूर्वी असा निर्णय झाला नाही. समितीच्या निर्णयामुळे घटस्फोटीता, परित्यक्ता व कुमारी मातांच्या मुलांना त्यांच्या आईची जात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Similar News