जगप्रसिद्ध मासिकासाठी ऐश्वर्याची निवड

Update: 2018-09-28 07:37 GMT

आपल्या सौद्रयाने रसिकाच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला जगप्रसिद्ध “एशियन जिऑग्रफिक' या मासिकाने आशियातील १०० प्रभावशाली व्यक्‍तींच्या यादीत स्थान दिले आहे. या मासिकाच्या यादीत अनेकांचे नाव आहे.या यादीत सचिन तेंडुलकर, मुकेश अंबानी, अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, उद्योगपती किरण मजूमदार शॉ आणि लेखिका अरुंधती रॉय यांची नावे आहेत.

एकंदरीत बॉलीवूड क्षेत्रातील महिला अभिनेत्रीच्या यादित फक्त ऐश्‍वर्या राय-बच्चन यांनाच स्थान देण्यात आले आहे. ऐश्वर्यासोबतच बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान देखील या यादीत आला आहे. भारतातील अनेक सेलिब्रिटीज, क्रिकेटर्स आणि उद्योगपतींचा या यादीत समावेश आहे. या आधी देखील ऐश्‍वर्याला एक्‍सलेंससाठी “मेरिल स्ट्रीप’ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते.

Similar News