आपत्ती थांबवता येत नाही. मात्र, त्याच व्यवस्थापन करता येतं. जगभरात गेल्या सव्वाशे वर्षात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अनेक आपत्ती मूळ आत्तापर्यंत 719 कोटी लोकांवर परिणाम झाला आहे. आज जगाची लोकसंख्या 730 कोटींच्या आसपास आहे. म्हणजे गेल्या सव्वाशे वर्षापूर्वी संपूर्ण एक जग अशाच प्रकारे इफेक्टेड झालं होतं.
सध्या कोरोनाची आपत्ती भारतासह जगभर आहे. संपूर्ण जग कोरोना आपत्तीच्या व्यवस्थापनात लागलं आहे. आपत्ती ही सांगून येत नाही. मात्र, आपत्ती पूर्व आणि आपत्ती नंतर जर योग्य व्यवस्थापन केलं तर आपण आपत्ती सारख्या संकटाची तीव्रता कमी करु शकतो. मात्र, या आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना राबवणं गरजेचं आहे. या संदर्भात आपत्ती व्यवस्थापनावर PHD करणारे प्रा.डॉ.जयेंद्र लरकुरवाळे यांनी केलेलं विश्लेषण