सारथी: सरकार सामाजिक न्यायाऐवजी अन्यायाची भूमिका घेतंय, राजकुमार बडोले यांची अजित पवारांवर टीका

Update: 2020-07-11 10:59 GMT

सारथी’ आणि ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ या दोन्ही संस्था अनुक्रमे ओबीसी व कौशल्य विकास मंत्रालयाऐवजी पुढच्या काळात नियोजन विभागाच्या अंतर्गत काम करतील. असं शासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. याचाच अर्थ या दोन्ही संस्थांची जबाबदारी आता नियोजनमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:कडे घेतली आहे. यावर राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी टीका केली आहे.

समाजातील प्रत्येक घटकांचा विकास व्हावा म्हणून खरं तर अजितदादांचे स्वागत करतो. पण तसाच न्याय SC, ST, VJNT मधील दुर्लक्षित घटकांना देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. असं मत बडोले यांनी व्यक्त केलं आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत आम्ही ‘समता प्रतिष्ठान’ सुरू केलं. त्याला अजून पर्यंत एक रुपया सुद्धा दिला नाही. ते सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. असा दुजाभाव जर सरकार करत असेल आणि फक्त एका विशिष्ठ जातीपातीच्या राजकारणासाठी सरकार म्हणून जर उपमुख्यमंत्री अजित पवार काम करणार असतील तर हे सरकार सामाजिक न्याय नाही तर सामाजिक अन्याय करत असल्याची टीका माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.

Full View

Similar News