२ दिवसांचा देशव्यापी संप, पोस्ट कामगार संघटनांचा नवीन पेन्शन योजनेला विरोध
टपाल कामगार संघटनांनी 28 आणि 29 मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात भाग घेतला आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या आणि खाजगीकरणाच्या हालचाली थांबवण्याच्या मागणीसाठी पोस्ट कर्मचारी संपावर गेल आहेत. डाकमित्र योजना मागे घ्यावी, संघटनेच्या प्रतिनिधींना दोन टर्म पदावर राहण्यासाठी निर्बंध घालण्याचे आदेश मागे घ्यावेत, तसेच थकीत अठरा महिन्यांचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना त्वरित देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी बुलडाणा येथे पोस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या संपामध्ये टपाल कामगारांच्या सर्व मान्यता प्राप्त संघटनांनसह इतर खाजगी व सरकारी सर्व संघटनांनी सहभाग घेतला आहे...