पोलिसांच्या मास्कला आता असणार माइक...

Update: 2020-06-11 17:22 GMT

पोलीस विभागासाठी उपयुक्त अशा सेग वे चे( सेल्फ बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) उद्घाटन आज गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मरीन ड्राईव्ह येथे संपन्न झाले. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त दक्षिण विभाग निशिथ मिश्रा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे पोलीस दल हे जागतिक पोलिसिंग स्टॅंडर्ड नुसार अत्याधुनिक सुसज्ज अशा साधन सामग्री भक्कम करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. त्यानुसार या सेग वे चे उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.

सध्याच्या कोरोनाच्या म्हणजे लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारची यंत्रणा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पोलिसाच्या मास्कला माईक लावण्यात येणार असून ते त्या द्वारे लोकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितते संदर्भात सूचना देऊ शकतील, तसेच त्यांच्या मदतीला पब्लिक ऍड्रेस सिस्टीम असलेले अत्याधुनिक ड्रोन देखील आहेत. त्याचाही उपयोग होऊ शकेल.

मरीन ड्राईव्ह येथे पन्नास सेगवेचे उद्घाटन करण्यात आले. यातील दहा सेग वे हे वरळी साठी तर पाच नरिमन पॉइंट साठी आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेग वे देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

Full View

Similar News