MaxMaharashtra Impact : ‘एमटीएस’चे संचालक योगेश सोमण सक्तीच्या रजेवर

Update: 2020-01-15 08:54 GMT

मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. “विभागाचे संचालक योगेश सोमण यांची विभागाच्या संचालक पदी पात्रता नसतानादेखील नियुक्ती करण्यात आली असून संचालक योगेश सोमण यांनी राजीनामा द्यावा," अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्याचप्रमाणे तासिका वेळेवर होत नाही, बाहेरुन येणारे नाट्यक्षेत्रातील कलावंतांच्या तासिका रोज होणार असं वारंवार सांगितले होतं. मात्र, तसं काहीही घडलं नाही. त्यामुळे अखेर विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन केलं होतं. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. ‘मॅक्स महाराष्ट्र’ ने या विद्यार्थ्यांचा आवाज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या रागाला मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातून वाट करुन दिली होती. या विद्यार्थ्यांनी १३ तारखेला तीव्र आंदोलन केलं होतं.

Full View

त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. ‘मॅक्स महाराष्ट्र’ ने प्रसारीत केलेल्या वृत्तानंतर विभागाचे संचालक योगेश सोमण यांना तात्काळ रजेवर पाठवण्याचे आदेश कुलसचिव अजय देशमुख यांनी दिले आहेत. यापुढील तथ्यांची माहिती समिती गठीत करुन केली जाईल, तोपर्यंत संचालक योगेश सोमण यांना तात्काळ रजेवर पाठवले जात असून उपरोक्त कारवाई पुढील चार आठवड्याच्या आत पार पाडली जाईल. अशी माहीती विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांनी दिली आहे.

Similar News