Max Impact: अखेर शौचालयातून पिण्याच्या पाण्याची टाकी बाहेर

Update: 2020-01-18 09:38 GMT

मुबंई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमधील युनिव्हर्सिटी मुबंई ऑफ लॉ (उमला) विभागामध्ये विद्यार्ध्यांसाठी शौचालयात पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा प्रताप केला होता. यासंदर्भात ‘मॅक्समहाराष्ट्र’ने “चक्क टॉयलेटमध्येच पिण्याच्या पाण्याची सोय, मुंबई विद्यापिठाचा प्रताप” या आशयाचं वृत्त दिलं होतं. या वृत्तानंतर विद्यापिठाच्या शौचालयातून वॉटर टँक अखेर बाहेर काढलेला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ अखेर थांबलाय.

सोबतच बार काऊंसिलिंग ऑफ इंडीयाची उमला या विभागाला परवानगी नाही, अशी माहिती देखील ‘मॅक्स महाराष्ट्र’वर दाखवली होती, अखेर बार काऊन्सलिंग विभागाने मुंबई विद्यापीठाला आठ लाखाचा दंड ठोठावला... या संदर्भात विद्यार्थ्यांनी ‘मॅक्समहाराष्ट्र’चे आभार मानले आहेत. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/527006951496333/?t=1

 

 

Similar News