अजित पवार : तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्र थारा देत नाही
कोल्हापूरमधील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय हा भाजपला मोठी चपराक आहे, तसेच समाजात तेढ निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्र त्याला माफ करत नाही, असा टोलाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. “स्वतः उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. काही झालं तरी यश आम्हाला मिळणार अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला, पण काही वेगळे विषय घेऊन जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, त्यातून मतं मिळतात की काय असाही प्रयत्न झाला, पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात त्याला थारा मिळला नाही आणि अतिशय चांगल्या मताधिक्याने जाधवताई निवडून आल्या” असेही अजित पवार यांनी सांगितले.