विराटने केली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी...

Update: 2018-08-21 13:02 GMT

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नॉटिंगहममध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत चांगलेच शतक झळकवून पराक्रमी कामगिरी गाजवली आहे. या त्याच्या पराक्रमातून त्याने चक्क ज्याला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मानतात त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विराटने या कामगिरीमुळे सोमवारी कसोटी कारकीर्दीतील २३ वे व आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ५८ वे शतक झळकावले आहे. विराटने तिसऱ्या कसोटीपर्यंत 73.33 च्या सरासरीने 440 धावा ठोकल्या आहेत. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत कोणत्याही भारतीय कर्णधाराने ठोकलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. विराटने तिसऱ्या कसोटीपर्यंत 73.33 च्या सरासरीने 440 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे सध्या त्याचीच सर्वत्र हवा सुरु आहे.

अझरुद्दीनचा हा विक्रम विराटने मोडीत काढला असून अद्याप दोन कसोटी सामने बाकी आहेत. त्यामुळे आणखी मोठा विक्रम रचण्याची संधी विराटकडे असणार आहे. यापूर्वी 1990 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत केलेल्या या विक्रमाला मोडीत काढले. अद्याप बाकी असलेल्या दोन सामन्यांच्या बाबतीत प्रेक्षकांची उत्सुकता आहे.

Similar News