आज भारत पाक क्रिकेट युद्ध

Update: 2018-09-19 13:36 GMT

आशिया कपच्या निमित्ताने आज भारत आणि पाकिस्तान हे दोन प्रतिस्पर्धी संघ आमने सामने येणार आहेत . कारण भारत -पाकिस्तान या दोन क्रिकेटवेडय़ा देशांमधील सामना म्हणजे टेन्शन, खुन्नस, थरार, राडा, शाब्दिक खडाजंगी. या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसाठी क्रिकेटचा खेळ म्हणजे युद्धच. कारण भारत - पाकिस्तान या संघांतील खेळाडूंना अन् त्यांच्या चाहत्यांना एकमेकांविरुद्धचा पराभव पचवायला अवघड असतो हे सर्वश्रुत आहे. राजकीय तणावमुळे या देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सामने होऊ शकली नाही.

कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत प्रभारी कर्णधार रोहित शर्मावर मोठी जबाबदारी असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला 124 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे पाकिस्तानी संघही सध्य जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारताने सहा वेळा आशिया कप जिंकलेला असून पाकिस्ताननेही दोन वेळा आपले नाव कोरलेले आहे. तर पाकिस्तानकडेही इमाम उल हक, फखर झमान, बाबर आझम, शोएब मलिक व कर्णधार सर्फराज अहमद असा मजबूत फलंदाजी क्रम आहे. रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी व हार्दिक पंडय़ा असे भारताकडे फलंदाजांची दिमतीला आहे.

Similar News