एशियन गेम्स घोडेस्वारीत भारताला दोन रौप्य

Update: 2018-08-26 12:36 GMT

इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये भारताच्या झोळीत आणखी दोन पदकांची भर पडली आहे. आज स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने घोडेस्वारीच्या शर्यतीत दोन रौप्यपदके पटकावली. वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात प्रत्येकी एक पदक भारताने पटकावले.

वैयक्तिक प्रकारात घोडेस्वार फौवादचे मिर्झा याने रुपेरी कामगिरी केली आहे. तब्बल 36 वर्षांनंतर भारताला या क्रीडाप्रकारात वैयक्तिक रौप्यपदक मिळाले. फौवाद आणि त्याच्या घोडा सिगनूर मेडिकोट याने 26.40 सेकेंदात शर्यत पूर्ण करत दुसरे स्थान पटकावले. 1982 नंतर घोडेस्वारीच्या शर्यतीत पटकावलेले हे पहिलेच पदक ठरले. या स्पर्धेत जपानच्या ओइवा योशीआकी याने सुवर्ण कामगिरी करत पहिला क्रमांक मिळाला.

भारताने सांघिक प्रकारातही रौप्यपदक मिळवले. त्यामुळे भारताच्या खात्यात 2 रौप्यपदकांची भर पडली आहे. राकेश कुमार, आशिष मलिक, जितेंद्र सिंग आणि मिर्झाने 121.30 सेकेंदात शर्यत पूर्ण करत रौप्यपदकाची कमाई केली.

Similar News