एशियाड 2018 च्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा तो ठरला एकमेव बॉक्सर.

Update: 2018-09-01 09:44 GMT

एशियाड स्पर्धेत भारताचा बॉक्सर अमित पंघालने आणखीन एका सुवर्ण पदकाची भर घातली आहे. 49 किलो वजनी गटात उझबेगिस्तानच्या हसनबॉय दुस्तमतॉवचा पराभव करत अमितने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. अमितने 3-2 अशा फरकाने सुवर्णपदक जिंकले.

भारताने एशियाड स्पर्धेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. एशियाड 2018 च्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अमित एकमेव बॉक्सर ठरला.

हरियाणाच्या अमितने 2017 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. भारताने आत्तापर्यंत 66 पदकांची कमाई केली आहे. 2010 सालच्या एशियाडमध्ये भारताने 65 पदकांची कमाई होती.

Similar News