'मुलांवरही संस्कार व्हावेत,बंधने यावीत'

Update: 2017-11-22 06:25 GMT

मुलींवर संस्कार करण्यासोबतच मुलांवरही संस्कार होणे जास्त गरजेचे आहे. मुलींवर बंधन असतात तशी मुलांवरही काही बंधन संस्काराच्या माध्यमातून घालावीत, अशी मागणी कोपर्डी खटला निकालाच्या पार्श्वभूमीवर तरुणींकडून करण्यात येत आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटेल. या घटनेमुळे सकल मराठा समाज संतापाने आणि त्वेषाने पेटून उभा राहिला. आणि मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटले. मुंबईतील मराठाच्या मोर्चाचे नेतृत्व करणारी बुलडाण्याची गायत्री भोसले आणि तिच्या मैत्रिणिंनी कोपर्डी खटल्याच्या निकालापुर्वी काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहा.

Full View

दुसरीकडे धुळ्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यींनी आणि विद्यार्थ्यांनीही कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निकालावर तीव्र प्रतिक्रिाया देत दोषींना फाशीच्या कठोर शिक्षेची मागणी केलीय. कठोर शिक्षा सुनावल्यावर भविष्यात अशा समाजविघातक वृत्तींना वचक बसेल, अशी प्रतिक्रिया ही विद्यार्थ्यांनी दिली.

Full View

Similar News