चेंबूरमधल्या पीडित मुलीला मिळालं 'पोलीस संरक्षण'

Update: 2017-10-25 07:13 GMT

चेंबूरमधल्या श्रमजीवी नगरमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड काढत तिला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पीडित मुलीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. तसेच याप्रकरणी आरोपी इम्रानला अटकही करण्यात आली. मात्र इम्रानच्या नातेवाईंकाकडून पीडित मुलीला धमकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचसंदर्भात शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी पीडित मुलीची भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित मुलीला पोलीस संरक्षण आणि गुन्हा दाखल केलेल्याची प्रत मिळवून दिली आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Full View

Similar News