आहा, या दोन पाकिस्तानी पायलटच्या तुम्ही प्रेमातच पडाल !

Update: 2018-06-23 11:52 GMT

मरिअम मसूद आणि शुमायला मजहर ही नावं तुम्ही ऐकलीयत का? सध्या पाकिस्तानात या दोघींचीच चर्चा आहे. यातली मरिअम कॅप्टन तर शुमायला फर्स्ट ऑफिसर आहे. दोघींनी गिलगीट च्या पर्वतरांगांवरून चॅलेंजिंग फ्लाइट पूर्ण केलीय. गिलगीट पर्वतरांगांवरून उड्डाण करायला विशेष टेक्निक आणि प्राविण्य आवश्यक असतं. सर्वच पायलटना असं उट्टाण करणं जमत नाही. मात्र या दोन्ही पायलटनी हे लीलया करून दाखवलं. उड्डाणाच्या वेळी त्यांचा कॉन्फीडन्स तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर पाहू शकता.

आहे की नाही प्रेमात पडण्यासारखं कर्तृत्व..

Similar News