जागतिक स्तनपान सप्ताह!

Update: 2018-08-02 10:15 GMT

कामा हॉस्पिटलच्या बालविकास खात्याने आरोग्य विभागाच्या सहकार्याने १ आॅगस्ट पासून जागतिक स्तनपान सप्ताह सुरु केला आहे. हा सप्ताह ९ आॅगस्टपर्यंत साजरा केला जाणार आहे. आॅगस्टचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. यावेळी या ठिकाणी स्तनपान करणार्या सप्ताहांची माहीती व जागरुकता कार्य़क्रमाचे उद्घाटन तसेच स्तनपानाचे फायदे या सर्व गोष्टींची माहीती सामान्य जनतेला विशेषत: महिलांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपान हे एक तंत्र आहे तर हे स्तनपान प्रत्येक आईने कसे करावे? केव्हा करावे? बाळाला किती वेळा स्तनपान दिले पाहिजे? स्तनपान संबंधित इतर बाबींविषयी माहिती या सप्ताहातील जागरुकता कार्यक्रमात देण्यात येणार आहे.

आईच्या दुधाला मुलासाठी एक अमूल्य देणगी आहे. स्तनपान हे प्रत्येक नवजात बालकासाठी गरजेचे आहे. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आईचे दुग्ध पौष्टिक आहाराचे उत्तम स्त्रोत आहे आणि आईच्या दुधाला पर्याय नाही. स्तनपानाने शिशु मृत्युदर कमी होतो. आईच्या पिवळा व घनपोकळाचे दूध नवजात बालकांसाठी परिपूर्ण आहार आहे. जन्मानंतर लगेच स्तनपान एक तासाच्या आत सुरु करावे. सहा महिन्यांपर्यंत मुलास सतत स्तनपान द्या. स्तनपानाची महत्वाची भूमिका शिशु मृत्यु दर कमी करणे आहे. आईच्या दुधात, चरबी, कॅलरीज, दुग्धशर्करा, जीवनसत्त्वे, लोह, खनिजे, पाणी मुलासाठी आवश्यक प्रथिने असल्यामुळे आईचे दूध पचविणे नवजात बालकासाठी जलद आणि सोपे होते. तसेच आईचे दुग्ध मुलाची रोग प्रतिकारशक्ती वाढविते, जे भविष्यात त्यांना विविध प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण देते. अशा प्रकारची बरीचशी माहीती कामा हॉस्पिटलच्या वतीने ९ आॅगस्ट पर्यंत महिलांना देण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच याप्रकारच्या कार्यक्रमाचा फायदा होईल व नवजात बालकांना नवीन जीवन जगता येईल.

Similar News