शहरातील महिला म्हटले म्हणजे आधुनिक पेहराव केलेली व स्वतंत्र विचाराची असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते त्यातुलनेत जेव्हा आपण ग्रामीण महिलांचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर गावाकडील पारंपारिक पेहराव उभा राहतो. मात्र शहरातील आधुनिक पेहराव घातलेल्या महिलांपेक्षा खेड्यातील महिला जास्त कमवतात हे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. २०११ च्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाने हे सांगितले आहे की सध्या घराबाहेर पडून काम करण्याच्या बाबतीत ग्रामीण महिला अग्रेसर ठरत आहे.
ग्रामीण भागातील ८१.२९% महिला घराबाहेर पडून काम करतात मात्र त्यातील ५६% महिला या अशिक्षित आहे. शहरी भागातील बहुतेक महिला विवाहानंतर काम सोडतात मात्र ग्रामीण भागातील महिला विवाहानंतरही कामावर जातात. ग्रामीण भागातील अधिक महिला या शेतमजुरीचे काम करतात.
जगभरात आर्थिक उत्पन्नात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. भारतात मात्र अशा उपाय योजनांचा अभाव असल्याने भारतातील महिला शिक्षित झाल्या मात्र कमवत्या होत नाहीये ही काळजीची बाब आहे.