२०२२ मध्ये भारत अंतराळात प्रवेश करणार आहे, या मिशनची घोषणा १५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या मिशनवर मिशन कंट्रोल सिस्टीम इंजिनीयर डाॅ. ललितांबीका यांची मिशन प्रमुख म्हणुन इस्रोने नेमणूक केली आहे.ललितांबिका यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अंतराळवीर अंतराळात प्रवेश करणार आहेत.५६ वर्षीच्या ललितांबिका तीन दशके इस्रोत कार्यरत आहेत त्या दोन मुलांच्या आईही आहेत. ललितांबिका यांना मिळालेली ही संधी त्यांच्या कामाचा एक भाग असली तरी भारतीय महिलांसाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे.