वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत काही वस्तू आणि सेवांवर कर कमी करण्यात आला. काही वस्तूंवरील कर कमी केल्यानंतरही सरकारच्या महसुलावर जास्त परिणाम होणार नाही यासाठी आजच्या बैठकीत काही वस्तुंच्या सेवा कराबाबत निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय हा आहे की, सॅनिटरी नॅपकिन आता करमुक्त करण्यात आले आहे.
याआधी सॅनिटरी नॅपकिन आणि बहुतांश हँडलूम-हँडिक्राफ्ट वस्तूंवर १२ टक्के जीएसटी लावण्यात येत होता. सूक्ष्म आणि लघु उद्योजकांची हँडिक्राफ्ट निर्मिती उद्योगात संख्या जास्त आहे. त्यामुळेच या क्षेत्रातील वस्तूंवरील कर कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता सॅनिटरी नॅपकिनला GST तून वगळण्यात आले आहे.