आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी उस्मानाबादच्या जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सिदराम सलगर यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवड केल्याची घोषणा केली आहे.
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या तेर गावातील एका सामान्य कुटुंबातील सक्षणा सलगर यांच्या कामाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची २०१६ मध्ये राज्याची स्टार प्रचारक म्हणून निवड केली होती. शिवाय त्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती संघटनेच्या स्थापनेपासून सक्षणा सलगर या संघटनेमध्ये काम करत आहेत.