देशातील महत्वाच्या आठ शहरांमधील महिलांना अधिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र शासनाने ‘निर्भया फंड’ अंतर्गत 2 हजार ९१९ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. मुंबई शहरासाठी २२५ कोटीं देण्यात आहेत.मुंबईसह दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि लखनौ या शहरांची निवड करण्यात आली आहे. निर्भया फंड अंतर्गत मुंबई शहरातील गुन्हे प्रवण भागात जीआयएस मॅपिंग सेवा उभारण्यासाठी, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी, गुन्हे तपास अधिकारी व विधी विभागाच्या अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. महिलांवरील शारीरिक अत्याचारांच्या गुह्यांमध्ये पोलीस दीदी कार्यक्रमास सक्षम करण्यात येते, तसेच माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.