मासिक पाळी झाली मानसिक पाळी…

Update: 2018-07-27 06:53 GMT

शिरकेस कुंडल येथे विजयाकाकू लाड विचार मंचच्या वतीने सॅनेटरी नॅपकिनच्या वापराबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विचार मंचच्या अध्यक्षा धनश्री लाड, क्रांती दूध संघाच्या संचालिका सुनंदा लाड प्रमुख उपस्थित होत्या. सरपंच प्रमिला पुजारी, सदस्या कमलेश सोळवंडे, उज्वला जाधव, राजश्री लाड, राजश्री पवार, शकुंतला फासे, जयश्री पट्टनशेट्टी, आर.वाय.पाटील, सुनिता तांदळे, नर्गीस मुल्ला, मनीषा लाड, पूजा लाड, सुरेखा कवठेकर, वर्षांरानी काशीद, विजया पवार आदींनी देखील यावेळी हजर होत्या. सध्याच झालेल्या निकालावरुन महिलांच्या मासिक पाळीत वापरल्या जाणार्या सॅनिटरी नॅपकीनला करमुक्त करण्यात आले. परंतू बाजारात उपलब्ध असलेले सॅनिटरी पॅड हे जेल पद्धतीने बनतात, ज्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे मत स्टेपअप फाऊंडेशन ऑफ इंडियाचे स्वप्नील शिरसेकर यांनी व्यक्त केले.

मासिक पाळी हे स्त्रीला मिळालेले एक वरदान आहे. या मासिक पाळीची लाज बाळगू नका, तसेच स्त्रीयांनी गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करू नये या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे गर्भाशयाचे भीषण आजार उद्भवत आहेत. मासिक पाळीमध्ये कापड वापरू नये आणि जर वापरायचे असेल तर ते कापड रोज बदलावे, मासिक पाळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे सॅनिटरी पॅडचा वापर करणाऱ्या १०० पकी ४० महिला या कॅन्सरने त्रस्त आहेत. या कार्यक्रमादरम्यान महिलांनी आपल्या समस्या मांडून मासिक पाळीवेळी एकंदरीत काय काळजी घ्यावी याबाबत चर्चा केल्या. कुंडल येथील प्रतिनिधी विद्यासंकुलची विद्याíथनी मंजुश्री फासे या फाऊंडेशनचा एक भाग म्हणून काम पाहते. परिसरातील शेकडो महिला, मुली कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

Similar News