कोरेगाव भीमा : आनंद तेलतुंबडे यांचा FIR रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Update: 2019-01-14 11:01 GMT

सर्वोच्च न्यायालयात आज कोरेगाव भीमा प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आनंद तेलतुंबडे यांची एफआयआर रद्द करण्याची मागणी फेटाळून लावत अटकेपासून चार आठवड्यांचा अंतरिम दिलासा असून, सदर प्रकरणाचा तपास सुरु असल्याने हस्तक्षेप करणार नसल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

कोरेगाव-भीमा हिंसेप्रकरणी नोंदवण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आनंद तेलतुंबडे यांनी दाखल केलेली याचिका २४ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर मुंबई उच्चन्याययाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी त्यांना तीन आठवड्याची मुदत दिली होती. त्याची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. आनंद तेलतुंबडे यांच्यावर माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे.

'मी कोणत्याही कार्यवाहीत सहभागी नाही'

आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात 'मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही’ अशी याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

मात्र, पोलिसांनी तेलतुंबडे यांच्याविरोधात पुरावे असल्याचा दावा केल्यानं न्यायालयानं तेलतुंबडे यांची उच्च न्यायालया बरोबरच सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळून लावली आहे.

३१ डिसेंबरला २०१७ ला भीमा कोरेगाव येथे एल्गार परिषद पार पडली होती. त्यानंतर १ जानेवारीला कोरेगाव-भीमा येथे मोठा हिंसाचार घडला होता. या हिंसाचारामागे माओवाद्यांचा संबंध असल्याचा दावा करत पुणे पोलिसांनी अनेकांविरुद्ध गुन्हे नोंदवले असून त्यात आनंद तेलतुंबडे यांचाही समावेश आहे.

दरम्यान या प्रकरणात मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचे देखील विविध राजकीय पक्षाने नाव घेतले गेले होते.

Similar News