जायकवाडीचे १८ दरवाजे उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा...

Update: 2022-09-22 13:12 GMT

जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा 98 टक्के वर पोहोचला असून धरणाचे सर्वच 18 दरवाजे चार फुट उघडण्यात आले आहेत. धरणातून एक लाख 13 हजार 184 क्युशेसने पाणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.त्याचबरोबर गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्यामध्ये अगरनांदूर, संगमजळगाव, हिंगणगाव, गोंदीखुर्द, कट चिंचोली, पांगुळगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, पिंपळगाव, खामगाव, राजापूर, गंगावाडी, राहेरी अशी अनेक गावे असून गोदावरी नदीकाठवर येत असल्याने या गावातील नागरिकांना नदीकाठी किंवा नदीमध्ये जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी गोदाकांठच्या ग्रामस्थांना आवाहन केले आहे, की आपली जनावरे, लहान मुले, व आपण सुद्धा नदी क्षेत्रात प्रवेश करू नये असे आव्हान गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे. सध्या गोदावरी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी काठावरील सर्व गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी कोणीही नदी पात्रात जाण्याचा प्रयत्न करू नये असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.असे गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी सांगितले.

दरवर्षी वरून येणारा जे पाणी आहे ते प्रचंड प्रमाणात खाली येते, त्यामुळे आमचे कापूस ,सोयाबीन ,ऊस असेल अतोनात नुकसान होत आहे, आम्ही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन आंदोलन केले कलेक्टर ला दिले, पण आम्हाला त्याची 1 रुपयाची देखील मदत प्रशासनाकडून मिळाली नाही, मागच्या वर्षीची देखील मदत आम्हाला मिळाली नाही, अचानक वरून सोडलेल्या पाण्यामुळे आमच्या शेतात शिरत आहे व सध्या आमच्या कापसाला दहा-पंधरा बोंडे लागलेले आहे, वरून येणाऱ्या अचानक पाण्यामुळे कापसाचे पूर्ण बोंड सडुन जात आहेत, कापूस येणारच नाही, ऊस असेल सोयाबीन असेल की पिके येत नाहीत व त्यांचा अतोनात नुकसान होत आहे, असे शेतकरी राम लकडे यांनी सांगितले.

आम्ही शेतकरी कधी बियाणे हे पीक कर्ज काढूनच मेहनत करीत असतो, यावर्षी मोठ्या प्रमाणात वरती पाऊस झाल्यामुळे व अचानक पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे काही शेतात बांधलेली जनावर असतील किंवा शेतात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, सोयाबीन असेल किंवा इतर जी शेतामधली पिके आहेत, काही जमिनीमधली तर चक्क माती सुद्धा वाहून गेलेली आहे, संदर्भात आम्ही काही निवेदन दिली, पिक विमा साठी आम्ही एपिक पाहणी ॲप मध्ये अर्ज केलेला आहे मात्र आम्हाला त्याची कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही, तसेच शासनाकडून आतापर्यंत मदत किंवा कुठलीही नुकसान भरपाई आम्हाला मिळाली नाही,2020 चा जो पिक विमा आम्हाला मिळाला नाही, आम्ही शेतकरी पिक कर्ज काढूनच शेती करत असतो, घेतलेलं पिक कर्ज आहे ते आम्हा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेलेच आहे, पण कमीत कमी शासनाने आमच्या हक्काचा पिक विमा देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, असे शेतकरी अशोक चव्हाण यांनी सांगितले.


Full View

Tags:    

Similar News