दुष्काळ : कैफियत शेतकरी शेतमजुरांची

Update: 2018-11-24 05:33 GMT

"साहेब पोटासाठी बाहेर पडावं लागत गावात जर पाणी असतं तर हे असं बाहेर गावात आम्ही कशाला गेलो असतो? साहेब पिण्याच्या पाण्याची सुद्धा गावात पंचायत आहे! त्यामुळं आता गावात धंदे नसल्या मूळं आम्हाला बाहेर पडावं लागतंय" ही कैफियत आहे शेतकरी शेत मजुरांची.

एकीकडे राजकारणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर बांधायला अयोध्येत जात आहेत तर दुसरीकडे विरोधक आरक्षणाच्या नावावर विधान सभेचं कामकाज गदारोळ करून बंद पाडत आहेत. या सगळ्यात मात्र जगाचा पोशिंदा म्हणला जाणारा शेतकरी होरपळत आहे. त्यांच्या मूलभूत गरजांसाठी त्यांना मोर्चे काढावे लागत आहेत. दिवसेंदिवस राज्यातील दुष्काळ तीव्र होत असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्ले गावात छोटं धारण आहे याच धरणावर आजूबाजूच्या गावांची आर्थिक नाडी अवलंबून आहे. मात्र आजची जर स्थिती पहिली तर या ठिकाणी थेंबभर सुद्धा पाणी नाही या मुळे शेतकरी हवालदिल आहे. स्वतःची शेती असताना ते आता ५० आणि ६० रुपयांची मजुरी करत आहेत.

काय आहे या शेतकऱ्याची स्थिती? पाहा हा व्हिडीओ...

Full View

Similar News