ED चा सर्वात मोठा घोटाळा लवकरच बाहेर काढणार- संजय राऊत

Update: 2022-02-19 10:19 GMT

शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राण यांनी ट्विट करुन लवकरच मातोश्रीवरील चौघांना ईडीच्या नोटीस येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप देखील केले. पण नारायण राणे यांच्या या आरोपांना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

यावेळी संजय राऊत यांनी EDच्या अधिकाऱ्यांवरच घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आणि येत्या काही दिवसात EDचा सगळ्यात मोठा घोटाळा आपण बाहेर काढणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. नारायण राणे यांनी सुशांत सिंह, दिशा सालियान, रED सर्वात मोठा घोटाळा लवकरच बाहेर काढणार- संजय राऊतमेश मोरे यांच्या हत्यांचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेकडे बोट दाखवले. त्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय हत्या कोणी घडवल्या असा सवाल उपस्थित करत गृहमंत्र्यांनी याची चौकशी करावी अशी मागणी विनायक राऊत यांनी केली. तर संजय राऊत यांनी "तुम्ही आमच्या कुंडली काढाल तर तुमच्या कुंडलीही आमच्याकडे आहेत, रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप है, बाप काय असतो ते आता तुम्हाला दररोज दिसेल" असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

त्याआधी संजय राऊत यांनी सकाळी ट्विट करुन किरीट सोमय्या यांना जाब विचारला होता. त्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला, पालघर जिल्ह्यातील निरव डेव्हलपर्समध्ये 260 कोटींची गुंतवणूक कुणी केली आहे, निकॉन ग्रीन व्हिला या प्रोजेक्टमध्ये मेधा व नील किरीट सोमय्या हे संचालक आहेत का.? यामध्ये EDच्या कोणत्या अधिकाऱ्याची बेनामी गुंतवणूक आहे? महाराष्ट्राला ते कळू द्या, असा सवाल उपस्थि केला.

Similar News